भरधाव कारची बैलगाडीला धडक : वडगावातील शेतकरी जागीच ठार
Speeding car hits bullock cart: Vadgaon farmer killed on the spot खिर्डी : भरधाव कारने बैलगाडीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात वडगावातील शेतकर्याचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर घडला. प्रवीण काशीनाथ पाटील (40) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
निंभोरा पोलिसात गुन्हा
शेतकरी प्रवणी पाटील हे बैलगाडीने शेतात जात असतांना रावेरकडून भरधाव वेगाने येणार्या चारचाकी (एम.पी.04 सी.पी.6380) ने बैलगाडीला मागून जोरदार धडक दिल्याने शेतकरी प्रवीण काशीनाथ पाटील हे रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले तर एका बैलाचे शिंग देखील तुटले आहे. वडगाव पोलीस पाटील संजय वाघोदे यांनी निंभोरा पोलिसांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक गणेश धुमाळ यांनी आपल्या ताफ्यासह धाव घेतली. मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तर धनराज पाटील यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक काशीनाथ कोळंबे करीत आहेत.


