पाचोरा शहरातील विवाहितेची आत्महत्या : नातेवाईकांनी केला घातपाताचा आरोप


Suicide of a married woman in Pachora City : Relatives allege accidental death पाचोरा : शहरातील आशीर्वाद रेसीडेन्सी भागातील नीलिमा अशोक पाटील (30) या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

नातेवाईकांचा घातपाताचा संशय
पाचोरा शहरातील आशीर्वाद रेसिडेन्सीतील नीलिमा अशोक पाटील (30) या विवाहितेचा मृतदेह शुक्रवार, 20 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांना मृत्यूची माहिती मिळताच त्यांनी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नीलिमा पाटील हिचे नातेवाईक रात्री उशिरापर्यंत पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या मांडुन होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !