अर्जुनवाडीच्या इसमाला मारहाण करीत लूटले : बोदवड तालुक्यातील प्रकार


Isma of Arjunwadi beaten and looted: Type in Bodwad taluka बोदवड : दुचाकीस्वाराला अडवत मारहाण करून त्याच्याकडील सुमारे 11 हजार 300 रुपयांची रोकड व 14 हजारांचा स्पेअर पार्ट असलेली पिशवी घेवून लुटारू पसार झाल्याची घटना बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे घडली. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांनी मारहाण करीत लूटले
घनश्याम उर्फ बाळा सुभाष सोनार (रा.अर्जुनवाडी, जामनेर) हे बुधवार, 18 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बोदवड ते जामनेर रोडवर शेलवड शिवारात सुर नदीच्या पुलाच्या अलीकडे अज्ञात लुटारूंनी बाळा सोनार यांच्या दुचाकीला अडवून त्यांना खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी, तोंडावर, पाठीवर, पोटावर मारहाण करुन त्यांच्या खिशातील पाकिटातील 11 हजार 300 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले तसेच दुचाकीला लावलेली 14 हजार रुपये किंमतीची स्पेअर पार्टचा सामान असलेली पिशवी घेऊन पळ काढला. या प्रकरणी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !