दीपनगर नवीन प्रकल्प प्रवेशद्वारावर उद्या आत्महदनाचा इशारा

युवा स्वाभिमान पार्टीचे शुक्रवारी दीपनगरला आंदोलन : वरणगाव शहर राष्ट्रवादीचा पाठिंबा
भुसावळ : दीपनगर प्रकल्पात स्थानिक तरुणांना अवजड कामे दिली जातात तर बाहेरील परराज्यातील तरुणांना सोयीची कामे देऊन दीपनगर प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप युवा स्वाभिमान पार्टीने केला असून या निषेधार्थ शुक्रवार, 27 डिसेंबरला ‘ताला ठोको’ आंदोलन करणार आहे. तसेच आत्मदहन करण्याचा इशारादेखील निवेदनातून दिपनगर प्रशासनाला देण्यात आला आहे.
आश्वासनांनी दरवेळी बोळवण
दीपनगर प्रकल्पात स्थानिक प्रदूषण पिडीत लोकांना केवळ आश्वासन देऊन बाहेरील राज्यातील तरुणांना कामावर घेतले जाते. येथील तरुण रोजगाराअभावी उपासमारिचा सामना करीत आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही दीपनगर प्रशासन केवळ आश्वासने देतात. त्या पलिकेकडे तरुणांना न्याय दिला जात नाही. काही तरुणांना कामावर घेतले तरी त्यांना अवजड कामे दिली जातात तर पर राज्यातील तरुणांना सोयीचे कामे देतात, असा दुजाभाव केला जात आहे त्यामुळे या विरोधात आत्मदहन करण्याचा इशारा युवा स्वाभीमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य अभियंता यांना निवेदन दिले आहे. या आंदोलनाला वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठींबा दिला असून निवेदनावर शहराध्यक्ष संतोष माळी यांची स्वाक्षरी आहे. या आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार किंवा कायदा सुवेवस्था बिघडल्यास सर्वस्वी जबाबदारी दीपनगर प्रशासनाची राहील असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


