भुसावळात सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

5 ते 12 जानेवारीदरम्यान महोत्सव : 8 रोजी आरोग्य तपासणी शिबिर
भुसावळ : वांजोळा रोडवरील आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सद्गुरु धनजी महाराज प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक भव्य कीर्तन महोत्सव 5 ते 12 जानेवारी दरम्यान होणार आहे. शुभारंभ 5 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता यशोत्सव महायज्ञ करून होणार आहे. सप्ताहात ह.भ.प.भरत महाराज, मंगेश महाराज, डालेंद्र महाराज, भागवत महाराज, दिनेश महाराज, विशाल महाराज, राजेंद्र महाराज, तुळशीदास महाराज यांची प्रबोधनात्मक भक्तीमय कीर्तने दररोज रात्री ठीक 8 वाजता होतील. प्रसंगी भुसावळ शहर व पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांची उपस्थिती राहणार आहे.
8 रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
8 जानेवारी सकाळी नऊ वाजेपासून मोफत रक्त तपासणी शिबबिर होणार आहे. यात सी.बी.सी.(हिमोग्लोबिन तपासणी), कोलेस्टेरॉल, एच.आय. व्ही., संधीवात (आर.ए.टेस्ट) आदी तपासण्या करण्यात येतील. तसेच जळगाव येथील सांधे प्रत्यारोपण व गुडघे तज्ञ डॉ.मनीष चौधरी, कार्डिओलॉजिस्ट डॉ.संदीप भारुडे, जनरल सर्जन डॉ.सुमित चौधरी, स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रीती भारुडे, डॉ.चेतन कोळंबे, डॉ.पवन सरोदे, बालरोगतज्ञ डॉ. सुयोग तन्निरवार, डॉ.प्रहिज फालक हे रुग्णांची मोफत तपासणी करतील. यासाठी मात्र कीर्तनथळी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
उल्लेखनीय कार्य करणार्यांचा होणार गौरव
सेवाभावी वृत्तीने अनेक वर्षापासून विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या संस्था, मंडळ, ग्रुप, व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, समाजसेवक, उद्योजक, पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
12 रोजी भव्य दिंडी सोहळा
12 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता भव्य दिंडी सोहळा निघणार आहे. यात भुसावळ परीसरासह पंचक्रोशीतील सर्व कीर्तनकार, टाळकरी, माळकरी, वारकरी, भजनी मंडळ यांचा सहभाग राहणार आहे. दरम्यान, 12 जानेवारी दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता ऋणानुबंध सन्मान सोहळा व उत्सव नेतृत्वाचा कार्यक्रम होईल तर होईल तर दुपारी दोन वाजेपासून महाप्रसादाचे वितरण होऊन कीर्तन महोत्सवाची सांगता होईल. यशस्वीतेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आल. असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. सद्गुरु धनाजी महाराज यांच्या स्मृतींना यानिमित्ताने उजाळा मिळणार आहे.


