भुसावळातील शिवकॉलनीत रस्त्यांनी टाकली कात
भुसावळ : जामनेर रोडवरील शिव कॉलनीत पहिल्यांदाच सिमेंट काँक्रेटचे रोड आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून व माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांच्या पाठपुराव्यातून करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पाठपुराव्याला आले यश
गेल्या कित्येक वर्षांपासून शिवकॉलनीतील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसह नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. माजी नगरसेवक रमाकांत महाजन यांनी आमदार संजय सावकारे यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर आमदार निधीतून शिव कॉलनीत सिमेंट काँक्रेटचे रोड नुकतेच तयार करण्यात आले. रस्त्यांनी कात टाकल्यानंतर विकास कॉलनी, माऊली नगर, साकेत कॉलनी, पंढरीनाथ नगर, अमरनाथ नगर या भागातील नागरीकांना देखील जाण्या-येण्याची मोठी सोय झाली आहे.






