भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे यांच्याहस्ते झाले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बिल्डर चेतन सुहास पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, उपमुख्याध्यापक रमण भोळे, पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, एस.एल.राणे, एस.पाठक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी केले. एस.पी.महाजन यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद नेमाडे यांनी तसेच चेतन पाटील यांनी विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्तीने खेळण्याचा सल्ला दिला. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, कॅरम तसेच रस्सीखेच या तीन स्पर्धा प्रकारांचा समावेश होता. सूत्रसंचालन एस.डी.वासकर यांनी तर आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन. झोपे यांनी मानले.






