भुसावळात पुन्हा धाडसी घरफोडी : 51 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary again in Bhusawal: 51 thousand instead of loot भुसावळ : शहरात चोर्‍यांसह घरफोड्यांचे सत्र थांबायला तयार नाही. कंडारी शिवारातील छायादेवी रांका नगरात चोरट्यांनी बंद घरातून 51 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घरात धाडसी चोरी
कंडारी शिवारातील छायादेवी राका नगरात श्रावण संपत तायडे (68) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. 18 ते 20 जानेवारीदरम्यान चोरट्यांनी संधी साधत बंद घरातील कपाटातून 30 हजारांची रोकड, एक हजारांची चिल्लर व 20 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण 51 हजारांचा ऐवज लांबवला. घरी आल्यानंतर तायडे यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भूषण जैतकर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !