ट्रॅक्टरवरून पडल्याने कन्हाळ्यातील मजुराचा मृत्यू : ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा
Laborer dies in Kanhala after falling from tractor: Against tractor driver crime भुसावळ : तालुक्यातील कन्हाळा येथील तरुणाचा ट्रॅक्टरवरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना 2 रोजी घडली होती. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रस्त्यावर पडताच तरुणाचा मृत्यू
संतोष गोपाळ पवार (29, कन्हाळा खुर्द) हा तरुण ट्रॅक्टर (एम.एच.19 सी.यु.0073) वरून वीटा भरण्यासाठी चालक अशोक सुपडू मोरे (कन्हाळा खुर्द) सोबत 2 जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता निघाला असताना खडका शिवारातील एमएसईबीजवळ भरधाव वेगातील ट्रॅक्टरवरून संतोष पडल्याने त्याच्या डोक्यास दुखापत होवून तो मरण पावला होता. ट्रॅक्टर चालकाकडे वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नव्हाता शिवाय तो हलगर्जीपणाने वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाल्याने एएसआय श्यामकुमार मोरे यांनी या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.






