जळगावात टेलर व्यावसायीकाला ऑनलाईन 54 हजारांचा गंडा
54,000 online fraud to a tailor businessman in Jalgaon जळगाव : जळगावातील टेलरला ऑनलाईनरीत्या भामट्यांनी गंडा घालत परस्पर खात्यातून 54 हजारांची रक्कम वळती केली. या प्रकरणी शनिवारी सायंकाळी 7 वाजता जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
सुभाष शालिग्राम इंगळे (49, संभाजी नगर, जळगाव) हे व्यवसायाने टेलर असून 17 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता ते दुकानात असतांना त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. त्याचा विश्वास संपादन करून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या फोन पे वरून ऑनलाईन पध्दतीने बँक खात्यातील 54 हजार 800 रूपये परस्पर वर्ग करून फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने शनिवारी सायंकाळी सात वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे.








