जामनेर तालुक्यातील तरुणीचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


molestation of young woman in Jamner taluka : Crime against two  जामनेर : तालुक्यातील मोहाडी येथील 20 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात जामनेर पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 20 रोजी रात्री नऊ वाजता घडली.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मोहाडी गावात 20 वर्षीय पीडीता कुटुंबासह वास्तव्यास असून 20 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता पीडित तरुणीच्या घरी संशयीत आरोपी आदेश आत्माराम नेटके व योगेश आत्माराम नेटके यांनी अनधिकृतपणे पीडीतेच्या घरात प्रवेश करीत तिचा विनयभंग केला तसेच शिविगाळ करीत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच आमच्या नांदी लागल्यास तुमचा खात्मा करू, अशी धमकीही देण्यात आली. तपास निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमृत पवार करीत आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !