शासनाच्या माध्यमातून मसाका व्हावा सुरू
मधुकर साखर कारखाना कर्मचार्यांच्या बैठकीत सूर
फैजपूर : फैजपूर येथील मधुकर साखर कारखाना कर्मचार्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात कारखाना शासनाच्या माध्यमातून सुरू झाला पाहिजे, अशी यावेळी अपेक्षा या बैठकीत कामगरांकडून व्यक्त करण्यात आली.
तातडीने कारखानाप्रश्नी निघावा तोडगा
मधुकर सहकारी साखर कारखाना सुरू झाला पाहिजे अशी सर्वच स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी कारखाना परीसरातील हनुमान मंदिरावर कारखान्याच्या पटावरील व जे कामावर येण्यासाठी इच्छुक आहे अशा कामगारांची कामगार संघटना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. कामगारांची थकीत देणी मिळावी यासाठी कारखाना लिलाव प्रक्रियेवर शासनाने स्थगिती दिली असून कामगारांची थकीत देणी मिळावी या मागणीवर कामगार ठाम असल्याने कामगारांची थकीत देणी मिळावी व कारखाना सुरू करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे.ही अपेक्षा घेवून या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष किरण चौधरी, सचिव सुनील कोलते, उपाध्यक्ष हरी इंगळे यांच्यासह बहुसंख्य कामगार उपस्थित होते.








