यावलला उद्या शहर काँग्रेस कमेटीचे हात से हात जोडो अभियान


यावल : ;यावल शहर व तालुका काँग्रेस कमेटीतर्फे हात से हात जोडो अभियानाला सोमवार, 23 रोजी सकाळी 10.30 वाजता यावल शेतकी संघापासून सुरूवात होणार आहे. यावेळी पक्षाचे ध्वजारोहण आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते व प्रभाकर आप्पा सोनवणे यांचे अध्यक्षतेखाली होईल.

माजी आमदार रमेश चौधरी, हाजी शब्बीर खान, भगतसिंग बापू पाटील, आर. जी.नाना पाटील, नितीन चौधरी, लिलाधर चौधरी, शेखर पाटील, जावेद जनाब, धनंजय चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहतील. जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, नगरसेवक, शहर काँग्रेस पदाधिकारी, तालुका काँग्रेस पदाधिकारी, अल्पसंख्यांक काँग्रेस पदाधिकारी, एस.सी. विभाग पदाधिकारी, महिला काँग्रेस पदाधिकार्‍यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !