भुसावळ उपविभागात कोम्बिंग : सात वॉण्डेट आरोपी जाळ्यात

49 वाहनधारकांवर कारवाई तर 71 व्यक्तींना बजावले समन्स


Combing in Bhusawal Sub-Division : Seven vandals accused in the net भुसावळ : शहरासह उपविभागात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार मध्यरात्री पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. कोम्बिंगदरम्यान सात वॉण्टेड आरोपींना अटक करण्यात आली असून 49 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर 71 व्यक्तींना समन्स बजावण्यात आले. याप्रसंगी रेकॉर्डवरील 24 हिस्ट्रीशीटरही तपासण्यात आले तर अवैध दारूसह जुगारावरही कारवाई करण्यात आल्याने अवैध धंदे चालकांमध्ये खळबळ उडाली.

गुन्हेगारी वर्तुळात उडाली खळबळ
शनिवारी रात्री 10 ते रविवारी पहाटे चार वाजेदरम्यान भुसावळ शहर, बाजारपेठ, तालुका व नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या उपस्थितीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. रेकॉर्डवरील 24 गुन्हेगार यावेळी तपासण्यात आले तर एकूण 71 व्यक्तींना समन्स बजावणी करण्यात आली. प्रसंगी चारही पोलीस स्टेशन हद्दीतील 25 व्यक्तींना बेलेबल वॉरंट बजावल्यानंतर सात हव्या असलेल्या संशयीतांना पोलिसांनी अटक केली. अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍या चार ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली तसेच दोन जुगाराच्या केसेस करण्यात आल्या व शहरातील 12 हॉटेलसह लॉजेस तपासण्यात आल्या. नाकाबंदीदरम्यान 49 वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच सात मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.







कोम्बिंगमध्ये यांचा समावेश
जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरचे निरीक्षक गजानन पडघण, बाजारपेठ पोलीस निरीक्षक् राहुल गायकवाड, तालुक्याचे निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक अनिल मोरे, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक स्वप्नील नाईक, सहा.निरीक्षक प्रकाश वानखेड, सहा.निरीक्षक अमोल पवार, सहा.निरीक्षक हरी भोये, अंबादास पाथरवट आदींसह कर्मचारी सहभागी झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !