चोरट्यांचा मोर्चा शेताकडे : बोदवड तालुक्यातील शेतकर्‍याचा एक लाख 20 हजारांचा मका लांबवला


Thieves march to the field : Maize worth 1 lakh 20 thousand of a farmer in Bodwad taluka was stolen बोदवड : तालुक्यातील गोळेगाव खुर्द गावातील शेतकर्‍याचा एक लाख 20 हजार रुपये किंमतीचा मका चोरट्यांनी शेतातून लांबवला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांचा कसून शोध
लक्ष्मण राजाराम पाटील यांचे वरणगाव-बोदवड रस्त्यावर शेत असून 20 ते 21 जानेवारी दरम्यान चोरट्यांनी शेतातून एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे 60 क्विंटल 140 मक्याचे कट्टे लांबवले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रवीण रवींद्र सोनार (34, गोळेगाव खुर्द) यांनी बोदवड पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक सचिन चौधरी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !