वरणगावला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त सर्वपक्षीय अभिवादन
भुसावळ : हिंदूहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, 23 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता बसस्थानक चौकात प्रतिमा पूजनासह अभिवादन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अभिवादन कार्यक्रमाला सहकारमित्र चंद्रकांत बढे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष अश्फाक काझी, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, विलास मुळे, उपतालुकाप्रमुख सूभाष चौधरी, शहरप्रमुख संतोष माळी, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख, उपशहरप्रमुख राम शेटे, सुखदेव धनगर, सुनील भोई, संजू कोळी, अशोक शर्मा, प्रवीण वाकोडे, नंदू खाराटे, संजू खराटे, सुरेश चौधरी, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी जमील टेलर, माळी समाजाचे अध्यक्ष संजू माळी, युवक राष्ट्रवादी काँगेसचे वाय.आर.पाटील, प्रल्हाद माळी, महिंद्रा शर्मा, सतीश जैन, गोलू राणे, प्रतिभा तावडे, भाग्यश्री गायकवाड, योगिता सोनार, आबा सोनार, मोहसीन खान आदींची उपस्थिती होती.

शिवभोजनवर खिरपुरीचे वाटप
हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बस स्टँड चौकातील शिवभोजन केंद्रावर खीरपूरीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला वरणगाव शहरातील भारतीत जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राजकिय, सामाजिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, विवीध समाजाचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.