रावेर भाजपातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेला खासदारांची भेट
MPs visit painting competition organized by Rawer BJP मुक्ताईनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टी रावेरतर्फे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. रावेर येथील यशवंत विद्यालयात आयोजित स्पर्धेला खासदार रक्षा खडसेे यांनी भेट देत मार्गदर्शन केले.
यांची होती उपस्थिती
सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, पं.स.चे माजी सभापती कविता कोळी, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, वासुदेव नरवाडे, जुम्मा तडवी, नत्थू धांडे, सागर भारंबे, संदीप सावळे, हरीलाल कोळी, महेश चौधरी, अरुण शिंदे, विनोद पाटील, पंकज चौधरी इ. तसेच रावेर तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
