भीमा नदीपात्रात चौघांचे मृतदेह आढळले

मृतांमध्ये दोन महिलांसह पुरूषांचा समावेश : पोलिसांकडून तपासाला वेग


Four bodies were found in the Bhima river bed पुणे : भीमा नदीपात्रात दोन पुरूषांसह महिलांचा मृतदेह आढळला असून या घटनेने या परीसरात खळबळ उडाली. पारगाव (ता.दौंड) हद्दीतील भीमा नदीपात्रात 18 ते 22 जानेवारीदरम्यान ही घटना उघडकीस आली असून सर्व मृतदेह तरुण असल्याने वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. एका पुरुषाच्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले. यावरून तपासाला दिशा मिळाली असून यवत पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आहेत.

पाच दिवसांत चार मृतदेह आढळले
पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात स्थानिक मच्छिमार मासेमारी करत असताना बुधवार, 18 रोजी एका स्त्रीचा मृतदेह आढळला तर परत शुक्रवार, 20 रोजी पुरुषाचा, शनिवार, 21 रोजी पुन्हा स्त्रीचा व रविवार, 22 रोजी एका पुरुषाचा मृतदेह असे सलग पाच दिवस 4 मृतदेह आढळून आले. भीमा नदीपात्रात पाच दिवसात चार मृतदेह सापडल्याने ही आत्महत्या की घातपात हा मोठा प्रश्नचिन्ह पोलीस यंत्रणे बरोबरच स्थानिकांनाही पडला आहे. एकावेळी सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने तर्क-वितर्काना उधाण आले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !