जळगावातील ड्रायफूट व्यापार्‍याची आठ लाखांची रोकड धूम स्टाईल लांबवली


Eight lakh cash of Jalgaon dryfoot trader extended dhoom style जळगाव : जळगावातील ड्रायफूट व्यापारी रात्री दुकान बंद केल्यानंतर घराकडे निघाला असतानाच भामट्यांनी रस्ता अडवत आठ लाखांची रोकड असलेली बॅग लांबवली. ही घटना पांडे चौकाजवळील रामदेव बाबा मंदिराजवळ सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रात्रीच्या घटनेने शहरात खळबळ
सिंधी कॉलनीतील रहिवासी मेधानी यांचे दाना बाजारात नमकिन, ड्रायफूट विक्रीचे दुकान असून ते सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर घरी निघाले असताना पांडे चौक ओलांडल्यानंतर रामदेव बाबा मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी दुचाकी आडवी उभी करीत रस्ता अडवला तर दुचाकीस्वारामागील भामट्याने मेधानी यांच्या जवळील कॅश, लॅपटॉप, मोबाईल असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावत पळ काढला. बॅग हिसकावून भामट्यांनी शेजारील गल्लीतून नेरी नाक्याकडे धूम ठोकली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह अधिकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !