अज्ञात वाहनाच्या धडकेत वरखेडच्या तरुणाचा मृत्यू


Varkhed youth dies in collision with unknown vehicle बोदवड ::अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात वरखेडे येथील 34 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चालकाविरोधात गुन्हा
पवन कैलास पाटील (34, वरखेड) हा तरुण दुचाकीवरून निघाल्यानंतर बोदवड-मलकापूर रस्त्यावर रवींद्र वसंत बारी यांच्या शेताजवळ रविवारी सायंकाळी पावणेसात वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पवनचा मृत्यू झाला. या प्रकरणी रूपेश धनराज पाटील (24, वरखेड) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र एकनाथ गुरचळ करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !