हतनूर येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली


The thieves stole the bike from Hatnoor भुसावळ : तालुक्यातील हतनूर येथील कृषी केंद्राजवळून चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

हतनूर येथील मुक्ताई कृषी केंद्राजवळ तक्रारदार सागर जीवन तायडे (27, गाते, ता.रावेर) यांनी 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.क्यू.6602) लावली असता चोरट्यांनी 20 रोजी रात्री संधी साधून दुचाकी लांबवली. तपास पोलीस उपनिरीक्षक ईस्माईल शेख करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !