वढोद्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणानंतर केला अत्याचार : आरोपी तरुणाला अटक
आधी केली अल्पवयीन तरुणीचे अपहरण नंतर केला अत्याचार : पोलिसांनी अखेर आवळल्या मुसक्या






यावल : तालुक्यातील वढोदा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातील एका 30 वर्षीय तरुणाने अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी यावल पोलिसात तरूणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. संशयीताला विशेष न्यायालयाने बुधवार, 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अपहरण करीत केला अत्याचार
वढोदा, ता.यावल येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे गावातील लोकेश कडू सोनवणे (30) या तरुणाने अपहरण केल्याने त्याच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शोध घेत या तरूणास ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैगींक अत्याचार झाल्याचे समोर आल्याने अपहरणाच्या गुन्ह्यात बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा पोस्कोन्वये कलम वाढवण्यात आले. संशयीत तरुणाला भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात हजर केले असता बुधवार, 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहे.


