यावलमधील सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा : पसार आरोपी जाळ्यात


Armed robbery at a bullion shop in Yawal : Pasar accused in the net यावल : शहरातील मेन रोडवर असलेल्या बाजीराव काशीदास कवडीवाले या सराफा दुकानावर जुलै 2021 मध्ये भर दिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. सहा दरोडेखोरांपैकी पाच संशयीतांना पोलिसांनी अटक केली मात्र सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्‍यापाडा, ता.चोपडा) हा पसार होता मात्र संशयीत चोपडा पोलिसांना एका गुन्ह्यात गवसल्यानंतर त्याला यावल पोलिसांनी अटक केली.

आरोपीला अटक करण्यात यश
शहरातील बाजीराव काशीदास कवडीवाले ज्वेलर्स दुकानात 7 जुलै 2021 रोजी भर दिवसा दरोडा पडला. यात 216 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 55 हजारांची रोकड असा एकूण 11 लाख 26 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल लांबवण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांच्या तपासात सहा संशयीत सहभागी असल्याचे समोर आले व या पैकी मुख्य संशयीत मुकेश भालेराव, रुपेश उर्फ भनभन चौधरी, निवृत्ती उर्फ शिवा गायकवाड, चंद्रकांत उर्फ विक्की चाले-लोणारी, यश अडकमोल अशा पाच जणांना अटक करण्यात आली होती तर सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्‍यापाडा, ता.चोपडा) हा पसार असल्याने त्याचा शोध सुरू होता. हा संशयीत 21 जानेवारी रोजी चोपडा पोलिसांना सत्रासेन रस्त्यावर तलवार बाळगतांना आढळल्यानंतर त्यास अटक करण्यात आल्याने यावल पोलिसांनी त्यास दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !