जळगावातील डॉक्टरांना सव्वा लाखांचा ऑनलाईन गंडा
Jalgaon doctor accused of being a military officer जळगाव : केंद्रीय विद्यालयात मिलिटरी अधिकारी असल्याचे सांगत भामट्याने जळगावातील डॉ.प्रमोद वसंत जोशी यांना बोलण्यात गुंतवणूक सव्वा लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासणी फी देण्याचे सांगून गंडवले
रविवार, 22 जानेवारी रोजी सकाळी डॉ.जोशी यांना सतीश कुमार नामक नाव सांगणार्या इसमाने केंद्रीय विद्यालय, जळगाव येथून मिलिटरी अधिकारी बोत असल्याचे सांगून शाळेतील 150 विद्यार्थ्यांची तपासणी करायची असल्याचे सांगून डॉक्टरांचा पत्ता व फोन नंबर मागविला. यावेळी डॉक्टरांनी तुम्ही देशाची सेवा करतात त्यामुळे मी तुम्हाला मोफत सेवा देईल, असे सांगितले. परंतु समोरील व्यक्तीने त्यांना नकार देत आम्ही तुम्हाला एका विद्यार्थ्यांची तपासणीसाठी 150 रुपये देऊ, असे सांगत त्यांनी डॉक्टरांचा विश्वास संपादन केला. रात्रीच्या वेळी संशयीताने पुन्हा डॉक्टरांना फोन करीत फोन पे व पेटीएम अॅपद्वारे एक लाख 24 हजार रुपये काढून फसवणूक केली. या प्रकारानंतर डॉक्टरांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


