केळी पीक विम्यासाठी शेतकर्‍यांसोबत राष्ट्रवादीचे 25 रोजी लाक्षणिक उपोषण


रावेर : पिकविम्याची रक्कम गेल्या तीन महिन्यापासून प्रलंबित असून रक्कम खात्यात मिळण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या माध्यमातून बुधवार, 25 जानेवारी रोजी शासनाचे व विमा कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी रावेर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे.

केळी उत्पादकांना सहभागाचे आवाहन
तालुक्यातील अनेक केळी उत्पादक शेतकरी या रकमेपासून अजून ही वंचित असून त्या सर्व शेतकर्‍यांना त्यांची मंजूर असलेली पीकविमा रक्कम देण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करीत असून त्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार, 25 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता तहसील कार्यालयासमोर, रावेर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. विम्याची वंचित असलेली रक्कम ज्यांची येणे बाकी असेल त्या सर्व शेतकर्‍यांनी या उपोषणात सहभाग घ्यावा. असे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !