चिनावला धर्मनाथ बीजनिमित्त हजारो भाविकांनी केला नवनाथ नामाचा गजर
सावदा : समस्त स्वामी समर्थ भक्तगण आयोजित धर्मनाथ बीजनिमित्त एकदिवसीय सामूहिक पारायण सोमवार, 23 रोजी येथील जागृत नवनाथ मंदिरात करण्यात आले. हजारो भाविकांनी नवनाथ पारायणाचा गजर केला. चिनावल येथील नवनाथ मंदिर परीसरात नवनाथाचे पारायण केल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होण्यास सुरुवात होते तसेच पारायणवेळी ज्या भाविकांनी ठेवलेल्या नारळात एक अध्यातिक उर्जा प्राप्त होवून आपोआप नारळ फुटते, त्यांच्यावर स्वामी समर्थांची विशेष कृपा प्राप्त होत असल्याची श्रद्धा असल्याने मलकापूरसह बुलढाणा, जळगाव, नाशिक, वर्धा, भुसावळ, यावल, रावेर परीसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांचे विशेष परीश्रम
सकाळी आठ वाजता सुरू झालेले पारायण तब्बल आठ तास अखंड सुरू होते. या पारायणावेळी आमदार शिरीष चौधरी, डॉ.कुंदन फेगडे यांनी भेट देत दर्शन घेतले. पारायण नियोजनासाठी श्री स्वामी समर्थ भक्तगण, विस्तार अधिकारी अरविंद कोलते, बाळू पाटील जितू वर्मा, शरद बोरोले, दामोदर महाजन, सुनील भंगाळे व नवनाथ मंदीर परीसरातील ग्रामस्थ व चिनावल येथील ग्रामस्थांनी विषेष परीश्रम घेतले.








