मुंबई-हावडा एक्स्प्रेसमध्ये रेल्वे तिकीट निरीक्षकास मारहाण : चाळीसगावातील दोघांविरोधात गुन्हा
Two in Chalisgaon assaulted a railway ticket inspector: one arrested भुसावळ : तिकीट नसल्याने दंड भरण्याचे सांगितल्यानंतर रेल्वेतील तिकीट निरीक्षकाला मुंबई-हावडा एक्सप्रेस मारहाण करण्यात आली होती. नाशिक-े चाळीसगावदरम्यान सोमवारी ही घडली होती. या प्रकरणी तिकीट तपासणीस ऋषीकेश मीना सियाराम (भुसावळ) यांच्या तक्रारीवरून अल्पवयीनास आकाश विकास जाधव (19, दोन्ही रा.चाळीसगाव) यांच्याविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा अधिक तपासार्थ चाळीसगाव लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. दरम्यान, अल्पवयीनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तिकीटाचा दंड मागितल्याने मारहाण
डाऊन 12809 मुंबई-हावडा मेलच्या कोच क्रमांक एस- 2 मध्ये मीना हे तिकीट तपासणी करीत असताना नाशिक येथून चढलेल्या तीन पुरुष व एक महिलांना तिकीटासंदर्भात विचारणा केली असता संबंधितांकडे तिकीट विचारल्यानंतर ते नसल्याने त्यांना दंड भरण्यास सांगितले असता संबंधितांनी हुज्जत घातली. अल्पवयीनासह जाधव याने मीना यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी हा गुन्हा चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेची माहिती कळताच इंडियन रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ ऑर्गनायझेशनचे सचिव निसार अहमद खान यांनी लोहमार्ग पोलिसात धाव घेतली.








