वाघोदा येथून अज्ञात चोरट्याने बैल जोडी लांबवली


यावल : तालुक्यातील वाघोदा येथील एका शेतकर्‍याच्या गोठ्यात बांधलेली बैल जोडी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी यावल पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
वाघोदा, ता.यावल येथील शेतकरी ज्ञानेश्वर पुंडलिक पाटील यांनी आपल्या घराच्या समोर असलेल्या गुरांच्या गोठ्यात त्यांची 30 हजार रुपये किंमतीची बैल जोडी बांधली होती व ते घरात झोपले असताना मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गुरांच्या गोठ्यामध्ये बांधलेली बैलजोडी लांबवली. हा प्रकार सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !