बोदवड जलसिंचन योजनेच्या पूर्णत्वासाठी पायी वारी : मावळ्यांचा बोदवडला सत्कार


बोदवड : बोदवड परीसर जलसिंचन योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी थेट 476 किलोमीटरचा पायी प्रवास करणार्‍या मावळ्यांचा शहरात सहृदय सत्कार करण्यात आला. मंत्रालयात प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

यांचा झाला सत्कार
भोले महाकाल फाऊंडेशनचे पदाधिकारी यांचा सत्कार गणेश जयंतीनिमित्त बोदवडचा राजा श्री गणेश मंदिरात करण्यात आला. भोले महाकाल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, ईश्वर सोनार, गोपाल माळी, संभाजी वाणी, सुपडू बिजगारे, कपिल मराठे, राहुल माळी, पुंडलिक जुंबले, गणेश निकम, भूषण सरोदे, वसंता सोनार, जगदीश हजारी, राहुल चौधरी, पांडुरंग वाघ, गौरव गंगतीरे, सुरेश नेवल, गोलू कवळकर, गजानन सोनवणे, रोहन पवार आदींचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !