मुंजलवाडीत आजपासून हरीनाम संकीर्तन सप्ताह
रावेर : तालुक्यातील मुंजलवाडी येथे गुरुवार, 26 जानेवारीपासून श्रीमद संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 2 फेब्रुवारी दरम्यान श्रीमद संगीतमय शिवमहापुराण कथा अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह होणार आहे.
नामवंत कीर्तनकारांची होणार कीर्तने
यात वेगवेगळ्या दिवशी ह.भ.प.काशिराम महाराज, ह.भ.प.समाधान महाराज, ह.भ.प.पूजा दिदी महाराज, ह.भ.प.हनुमंत महाराज, ह.भ.प.रामेश्वर महाराज, ह.भ.प.दीपक महाराज, ह.भ.प.परमेश्वर महाराज या कीर्तनकारांची कीर्तने होतील. अखेरच्या 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता दिंडी सोहळ्यानंतर ह.भ.प. विनीत कुमार यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप होईल. हरीनाम संकीर्तन सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.








