हिंगोण्याजवळ दुचाकी-कारमध्ये अपघात : दोघे जखमी
Two-wheeler-car accident near Hingone : Two injured यावल : यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोण्याजवळ दुचाकी व कारमध्ये अपघात होवून दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी दुपारी घडला. जखमींना घटनास्थळावरून खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता हलवण्यात आले आहे. अपघात कसा घडला हे मात्र कळू शकले नाही.
अपघातानंतर पोलिसांनी घेतली धाव
यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ चारचाकी (वाहन क्रमांक एम.एच. 19 सी.झेड. 7806) व्दारे लक्ष्मण नारायण सपकाळे फैजपूरकडून यावलकडे येत असताना दुचाकीने यावलकडून फैजपूरकडे कलीम सलीम तडवी (20) व नदीम खान सलीम खान (18, दोघे रा.साकळी) हे निघाले असताना अपघात घडला. या अपघातात अशपाक बिसमील्लाह तडवी (साकळी) व चारचाकी वाहन चालक लक्ष्मण नारायण सपकाळे (59) हे किरकोळ जखमी झाले. जखमींवर फैजपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर, राजेश बर्हाटे यांनी धाव घेतली.








