सुसरी येथे वयोवृद्धाची आत्महत्या
Suicide of an elderly person in Susari भुसावळ : तालुक्यातील सुसरी येथील 75 वर्षीय वयोवृद्धाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मुरलीधर रामू पाटील (75, सुसरी, ता.भुसावळ) असे मयताचे नाव आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
पाटील यांनी राहत्या घरात लाकडी बीमला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तपास नाईक नावेद अली करीत आहेत.








