जळगाव तालुक्यातील महिलेचा विनयभंग : आरोपी तरुणाला सहा महिन्याची शिक्षा


molestation of woman in Jalgaon taluka : Accused youth sentenced to six months जळगाव : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव तालुक्यातील तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा व तीन हजारांचा दंड जळगाव न्यायालयाने बुधवारी सुनावला.

विनयभंग प्रकरणी दाखल होता गुन्हा
जळगाव तालुक्यातील एका गावात 40 वर्षीय महिलेचा आरोपी विलास जुलाल भिल (25) याने 21 मे 2014 रोजी विनयभंग केल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अहिरे यांच्याकडे होता. या प्रकरणी 2 डिसेंबर रोजी न्या.पी.आर.वागडोळे यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र जळगाव जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत महिला, तिचे पती, गावातील व्यक्ती आणि तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक अशोक अहिरे यांची साक्ष महत्वाची ठरली.







सहा महिन्यांची शिक्षा
साक्षी व पुराव्याअंती न्यायालयाने विलास जुलाल भिल याला दोष ठरवत सहा महिन्याची शिक्षा आणि तीन हजारांच्या दंडाची शिक्षा बुधवार, 25 जानेवारी रोजी यासाठी पैरवी अधिकारी भगवान आरेख आणि विलास पाटील यांनी काम पाहिले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !