विहिर खोदकामाचे पैसे मागण्याच्या कारणावरून जामन्यातील दाम्पत्यास मारहाण
A couple in Jamanya was beaten up for demanding money for digging a well यावल : तालुक्यातील जामन्या येथे विहिर खोदकामाचे उर्वरीत पैसे मागितल्याचा राग येऊन पती-पत्नीला सात जणांनी मिळून मारहाण केली. या हाणामारीत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र देखील लांबवण्यात आले. या प्रकरणी यावल पोलिसात सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या संशयीतांविरोधात गुन्हा
जामन्या, ता. यावल येथील पुष्पाबाई प्रताप बारेला यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती प्रताप बारेला हे विक्रम भिलाला यांच्या शेतात विहिर खोदकाम करण्यास गेले होते व विहिर खोदकामाचे उर्वरीत पैसे मागण्यासाठी गेल्याने त्याचा राग येऊन विक्रम बाथला भिलाला, रमेश हंज्या भिलाला, वेडा बाथला भिलाला (उसमळी, ता.यावल) व मालू खूमसिंग भिलाला, गुडवा खुमसिंग भिलाला, ताराशिव खूमसिंग भिलाला व तारल्या खुमसिंग बिलाला (सर्व रा.तमावली, ता.भगवानपुरा, जि.खरगोन) या सात जणांनी या पती-पत्नीला जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची पोत तोडून लांबवण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे करीत आहे.








