प्रजासत्ताक दिनी अडीच हजारांची लाच भोवली : गारखेड्यातील ग्रामसेवक जळगाव एसीबीच्या जाळ्यात


A bribe of 2500 rupees was taken on Republic Day : Garkheda Gram Sevak in Jalgaon ACB’s net जळगाव : लेखा परीक्षणाबाबतची माहिती ही माहितीच्या अधिकारात देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती अडीच हजारांची लाच स्वीकारणार्‍या चोपडा तालुक्यातील गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अनिल नारायण गायकवाड (50, रा.चहार्डी, ता.चोपडा) यांना गुरुवारी दुपारी जळगाव एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. विशेष म्हणजे गुरुवार, 26 रोजी प्रजासत्ताक दिनीच आरोपी जाळ्यात अडकल्याने ग्रामपंचायत वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

अडीच हजारांची लाच भोवली
गारखेडा येथील 49 वर्षीय तक्रारदाराने गारखेडा व बाभळे ग्रुप ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक यांच्याकडे ग्रामपंचायतीत 2015 ते 2020 या कालावधी दरम्यान ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या विविध योजनांच्या कामाचे झालेले लेखापरीक्षण बाबतची माहिती ही माहितीच्या अधिकाराचा अर्ज करून मागितली होती. ही माहिती वेळेत न मिळाल्याने तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात गुरुवाीर पंचासमक्ष प्रथम तीन हजार व तडजोडीअंती अडीच हजारांची मागणी केल्याने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. आरोपीने लाचेची रक्कम देण्यासाठी धरणगाव अमळनेर रोडवरील सिूं ढाबा येथे बोलावल्याने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांया नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव, पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, बाळू मराठे, ईश्वर धनगर, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, सुनील पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, जनार्धन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !