देवगावच्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


जळगाव : विजेच्या धक्का लागल्याने तालुक्यातील देवगाव येथील 20 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. हितेश शंकर सोनवणे (20, रा.देवगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुका पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव तालुक्यातील देवगाव येथील हितेश शंकर सोनवणे हा आपल्या परीवारासह वास्तव्याला होता. गुरूवारी अंधारामुळे त्याला अंदाज न आल्याने तो इलेक्ट्रिक डीपीवर धडकला. यात त्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर परीरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. या संदर्भात गुरुवारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पेगडे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !