मुंबईत उद्या जागतिक साळी फाऊंडेशचा वर्धापनदिन कार्यक्रम


फैजपूर : जागतिक साळी फाऊंडेशनच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील प्रभादेवी, रवींद्र नाट्यमंदिरात शनिवार, 28 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास समाजबांधवांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हातमागावर कापड विणण्याची परंपरा असणारा आणि पैठणी तयार करणारा साळी समाज कालानुरुप आज अन्य क्षेत्रांमध्येही यशस्वी वाटचाल करीत असून महाराष्ट्रातील ईचलकरंजी, येवला अशा भागांतुन कधीकाळी बहुसंख्य असणारा साळी समाज आज भारतभर अनेक राज्यांमध्ये विखुरलेला आहे. ईतकेच नव्हे तर अनेक साळी तरुण -तरुणी परदेशांतही व्यावसायानिमित्त वास्तव्यास आहेत.

द्वितीय वर्धापनदिनानिमित्तस् विविध कार्यक्रम
जागतिक स्तरावर समाजामध्ये समन्वय साधत असतानाच समाजातील मागासलेल्या कुटुंबांना सहाय्य करून समाजामध्ये कोणीही कोणत्याही बाबतीत वंचित राहू नये अशा व्यापक उद्देशाने स्थापन झालेल्या ‘जागतिक साळी फाऊंडेशन’ ने अल्पावधीतच संपूर्ण साळी समाजात मानाचे स्थान निर्माण केले आहे. मंत्रालयातील कक्ष अधिकारी असलेले विजय वक्ते हे स्वतः समाज उन्नतीच्या ध्यास घेतलेले साळी समाजातील एक मान्यवर व्यक्तिमत्व असून त्यांच्याच प्रेरणेतून त्यांच्या पत्नी आणि प्रमुख विश्वस्त निशा विजय वक्ते यांनी 2017 रोजी ‘जागतिक साळी फाऊंडेशन’ ची स्थपना केली. विजय वक्ते व त्यांच्या सहकार्यांनी समाजाचा सर्वंकष अभ्यास करून भक्कम पायावर उभी राहिलेली ही संस्था सर्व समाजाला सोबत घेऊन प्रगतीपथावर कार्य करीत आहे. समाजातील अनेक गरजू बंधू-भगिनींना स्वतःचा उत्कर्ष साधण्यासाठी समाजातीलच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून फाऊंडेशनने सहाय्य केले आहे. समाजातील कोणीही व्यक्ती हलाखीच्या परीस्थितीत जगूू नये, शिक्षणापासून वंचित राहू नये, प्रत्येकाने नोकरी अथवा व्यवसाय करावा अशा प्रागतिक उद्देशांनी कार्यरत असलेल्या ‘जागतिक साळी फाऊंडेशन’चा द्वितीय वर्धापनदिन शनिवार, 28 डिसेंबर 2019रोजी सकाळी 10 वाजेपासून रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होत आहे. स्थापनादिन तसेच प्रथम वर्धापनदिनास भारतभरातुन व परदेशांतुन कार्यकर्ते कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच दुसर्‍या वर्धापनदिनालाही देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशांतूनही साळी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. समस्त साळी समाजबांधवांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन ‘जागतिक साळी फाऊंडेशन’ च्या विश्वस्तांतर्फे करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.