जळगावातील दत्त कॉलनीत सहा लाखांची धाडसी घरफोडी


Daring house burglary worth six lakhs in Dutt Colony in Jalgaon जळगाव : शहरातील दत्त कॉलनीतील चार्टर्ड अकाऊंटंट राजेश कळंत्री हे कार्यक्रमानिमित्त बीड येथे गेल्याची संधी चोरट्यांनी साधून सुमारे सहा लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची संधी चोरट्यांच्या पथ्थ्यावर
तक्रारदार राजेश कळंत्री दत्त कॉलनीमध्ये कुटुंबासह वास्तव्यास असून त्यांची कन्या नेहा ही सीएची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने तिच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी कळंत्री हे बीड येथील सासूरवाडीला गेले असता 26 ते 27 दरम्यान चोरट्यांनी संधी साधली. शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घरकाम करणारी महिला कामावर आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. महिलेने लागलीच कळंत्री यांचे मावसभाऊ स्वप्निल लाठी यांना घरात चोरी झाल्याची माहिती दिली.







जिल्हापेठ पोलिसात गुन्हा
चोरट्यांनी एक लाख 70 हजारांची रोकड, दोन लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 70 हजार रुपये किंमतीचे चांदीचे भांडे व कॉईन आणि एक लाख रुपये किंमतीचा हिरामोती (डायमंड) आणि अंगठी असा मुद्देमाल लंपास केला आहे. राजेश कळंत्री यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास कॉन्स्टेबल शरीफ रहिम शेख करीत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !