चाळीसगावातील 11 गुन्हेगारांवर ‘मोक्का’


‘Mokka’ on 11 criminals in Chalisgaon चाळीसगाव : जळगावातील बावरी गँगवर मोक्काची कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच चाळीसगाव शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी टोळीतील तब्बल 11 जणांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या संशयीतांविरोधात मोक्का
टोळीप्रमुख अमोल उगन गायकवाड (25, रा. स्वामी समर्थ कॉलनी, नागद रोड, चाळीसगाव), टोळी सदस्य सुमित ऊर्फ बाबा अशोकराव भोसले (रा. नागद रोड, चाळीसगाव) (अटकपूर्व जामीनावर), कृष्णा उगन गायकवाड (रा.नागद रोड, चाळीसगाव), संतोष ऊर्फ संता पहेलवान रमेश निकुम (रा. हिरापुर ता. चाळीसगाव), विक्की ऊर्फ शुभम विजय पावले (23, रा. हिरापूर, ता.चाळीसगाव), श्याम उर्फ सॅम नामदेव चव्हाण (24, रा.हिरापूर, ता. चाळीसगाव), सचिन सोमनाथ गायकवाड (22, रा.बाबाजी चौक चाळीसगाव), जयेश दत्तात्रय शिंदे (पाटील) (24, रा.भोरस खुर्द, ता.चाळीसगाव), उद्देश उर्फ गुड्डू सुधीर शिंदे (24, रा.हिरापूर, ता.चाळीसगाव), योगेश रतन पांचाळ (पडवळकर) (26, रा.हिरापूर, ता. चाळीसगाव), पुष्पराज ऊर्फ सुनिल जगताप (रा.पिंपळखेड, ता.चाळीसगाव, फरार) यांच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली.







यांनी तयार केला प्रस्ताव
पोलीस अधीक्षक एम.राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना मार्गदर्शन करून टोळीवर दाखल गुन्ह्यात मोक्का काययद्याचे कलम वाढविण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी मोक्का प्रस्ताव तयार करून स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या मार्फत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या कार्यालयात 22 जानेवारी रोजी सादर केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन 21 जानेवारी रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्याकडे प्रस्तावर सादर केला. विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन वरील आरोपीतांनी टोळीने केलेल्या गुन्हे अभिलेख तपासणी करून सदर गुन्हयांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे क. 3(1)(खख), 3(2), 3(4) (मोक्का) हे कलम लावण्याची परवानगी 25 जानेवारी रोजी दिल्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. वरील गुन्हयांतील वरील आरोपीतांवर मोक्का कायदयाखाली कलम लावण्यात आला आहे. याकामी निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, सुनील पंडीत दामोदरे तसेच चाळीसगाव शहरचे निरीक्षक कांतीलाल पाटील, सहा.पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी योगदान दिले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !