पिंप्रीसेकमच्या युवकाचा रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने मृत्यू


भुसावळ : रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने पिंप्रीसेकमच्या 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पिंप्रीसेकम येथे दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली. पवन विलास तायडे (19, रा. पिंप्रीसेकम, ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील सतीश बुवा यांच्या शेतात गोलू उर्फ किशोर तायडे हा चालक निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवित असतांना त्याच्या ट्रॅक्टरची धडक लागल्याने पवन ट्रॅक्टरखाली (एम.एच.19 जी.व्ही.0075) आल्याने ट्रॅक्टरला मागे जोडलेल्या रोटोव्हीटरमध्ये आल्याने गंभीर जखमी होवून मृत झाला. या घटनेनंतर चालक पोलिसांना माहिती न देताच पसार झाला. याप्रकरणी योगेश कैलास तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गोलू तायडेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल पवार पुढील तपास करीत आहे.


कॉपी करू नका.