भुसावळच्या प.क.कोटेचा महाविद्यालयातील डॉ.मंगला साबद्रा यांचे प्राचार्य पद रद्द

जळगाव विद्यापीठाची धडक कारवाई : शहाद्याचे अशोक पाटील यांचीही मान्यता रद्द
जळगाव : भुसावळ शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला साबद्रा व शहादा येथील प्राचार्य डॉ.अशोक पाटील यांची प्राचार्य पदाची मान्यता कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने रद्द केली आहे. कार्यकाळ संपल्यानंतर अन्य प्राचार्यांची नियुक्ती होत नसल्याने या संदर्भात राज्यपालांसह विद्यापीठ स्तरावर लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने विद्यापीठाने नोटीस बजावूनही दखल घेतली जात नसल्याने विद्यापीठाने ही कारवाई केली.
नोटीसीनंतर दोघांचा राजीनामा
नंदुरबारच्या जीटीपी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव तसेच जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.आबेदा शेख यांनी नोटीस मिळाल्यानंतर राजीनामा दिल्याने त्यांची प्रभारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली तर भुसावळसह शहाद्यातील प्राचार्यांनी राजीनामा न दिल्याने त्यांचे पद विद्यापीठाने रद्द केले आहे.


