रावेर तालुक्याला दहा वर्षानंतर जि.प.अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !


केर्‍हाळ्याच्या नंदा पाटील व मोरगावच्या रंजना पाटलांची नावे चर्चेत

रावेर : जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखिव असून या पदावर विराजमान होण्यासाठी लॉबिंग लावायला सुरुवात झाली आहे.यंदाचे अध्यक्षपद रावेर लोकसभेत येणार असून यामध्ये रावेर तालुक्यातील नंदा पाटील (के-हाळा) तर रंजना पाटील (मोरगांव) या दोघे महिलांची नावे आघाडीवर आहे. यांच्या पैकी एकाला अध्यक्ष पदाचा बहुमान मिळण्याची दाट शक्यता असून असे झाल्यास तब्बल दहा वर्षा नंतर रावेर तालुक्याला अध्यक्षपदाचा बहुमान मिळणार आहे.तालुक्यासह जिल्हाभरात या दोघे महिलांची नावे सद्यास्थितीत चर्चित आहे.तसेच भाजपात नाराज व माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच माजी मंत्री आ गिरीष महाजन या दोघांच्याही भूमिके नंतर या पदावर नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. भाजपात अंतर्गत धुसपुस राहिल्यास शेवटी महाविकासआघाडी याचा लाभ घेऊन या दोघांच्याही स्वप्नावर पाणी फिरवू शकते परंतु अध्यक्ष भाजपाचाच होणार असल्याचे मत भाजपा मधील सूत्रांमधून समजते.

दोघे पाटलांची नावे आहेत चर्चेला
रावेर तालुक्यातुन पाल-के-हाळा गटाचे नंदा अमोल पाटील तर ऐनपुर-खिरवड गटाचे रंजना प्रल्हाद पाटील या प्रतिनिधित्व करतात दोघांचीही पहीलीच टर्म असून दोघे जरी भाजपाचे असले तरी माजी मंत्री महाजन व खडसे यांचे निकटवर्तीय आहे.

खडसेंच्या सहकार्याने तायडे झाले होते अध्यक्ष
यापूर्वी 2007 ला जिल्हा परिषद अध्यक्षपद एससी साठी राखिव झाल्याने त्यावेळी भाजपाचे मुरलीधर दगडू तायडे यांना माजी आ अरुणदादा पाटील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सहकार्याने मार्च 2007 ते ऑगस्ट 2009 च्या दरम्यान अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता

जैन यांच्या सहकार्यामुळे तडवी होते अध्यक्ष
2000 मध्ये जिल्हा परीषद अध्यक्षपद एसटी साठी राखिव झाल्याने यावेळी राष्ट्रवादीचे स्व.उखा कासम तडवी यांना माजी मंत्री सुरेशदादा जैन व राष्ट्रवादीचे ईश्वरलाल जैन यांच्या सहकार्यामुळे ऑक्टोबर 2000 ते मार्च 2002 च्या दरम्यान अडीच वर्षाचा कार्यकाळ मिळाला होता.


कॉपी करू नका.