यावलमध्ये नूतन निरीक्षकांचे अवैध धंद्यांविरुद्ध धाडसत्र

यावल : तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे घातक रसायनांव्दारे तयार करण्यात आलेल्या गावटी हातभट्टीची दारू विक्रीविरोधात यावल पोलिस ठाण्यात नव्यानेव रूजू झालेल्या अरुण धनवडे यांनी मोहिम उघडली असून या कारवाईने अवैध धंदे चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.रविवार, 29 डिसेंबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अंजाळे शिवारातील तापी नदीच्या काठावरील बेकायदेशीर गावटी दारूच्या हातभट्टीचे एकूण सहा बॅरेल भरलेले कच्चे-पक्के रसायन एक हजार 100 लिटर व तयार केलेली जवळपास 40 लिटरची गावठी दारू उद्ध्वस्त करण्यात आली. यावेळी संशयीत आरोपी मात्र पसार झाले. या कारवाईत यावल पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांसह गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले.


