बोदवड भाजपा तालुकाध्यक्षपदी विनोद कोळी

बोदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत बोदवड तालुका भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी विनोद दत्तु कोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जे.डी.सी.सी.बँक अध्यक्ष रोहिणी खडसे, भाजपा जळगाव जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कुलकर्णी, डॉ.वैष्णव, भाजपा जिल्हा चिटणीस कैलास चौधरी, माजी भाजपा तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, जि.प.सदस्य भानुदास गुरचळ व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


