धरणगाव पालिका पोटनिवडणुकीत सेनेचे निलेश चौधरी विजयी


धरणगाव : धरणगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पाचव्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी विजयी झाले. सलीम पटेल यांच्या निधनानंतर रीक्त जागेसाठी 29 रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती तर या निवडणुकीत 57.73 टक्के मतदान झाले.

धरणगाव पालिकेवर सेनेचे वर्चस्व
सोमवारी पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. त्यात पहिल्या फेरी अखेर भाजप उमेदवार मधुकर रोकडे 627 मतांनी आघाडीवर होते तर दुसर्‍या फेरीत शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी एणक हजार तर तिसर्‍या फेरीतही शिवसेनेचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी एक हजार 855 मतांची आघाडी घेतली. दरम्यान, पोटनिवडणुकीत सेना उमेदवार निलेश चौधरी हे विजयी झाल्यानंतर धरणगाव पालिकेवर पुन्हा सेनेचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.


कॉपी करू नका.