पोलिसांची सतर्कता : शैक्षणिक कागदपत्रांची फाईल विद्यार्थ्याला केली परत


भुसावळ : शैक्षणिक कागदपत्रे असलेली फाईल हरवल्याबाबत शहर पोलिसात अंकित राजू पांडे (अचलपूर, अमरावती) या रेल्वेत अँप्रेटीस करणार्‍या तरुणाने 8 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती मात्र कागदपत्रे सापडत नव्हती तर रविवारी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी बंटी सैंदाणे, बडगुजर, मोहन पाटील, तांगडे व साळुंखे हे शहर पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना समता नगर परीसरात सोमनाथ मंदिरासमोरील बेवारसरीत्या फाईल आढळल्यानंतर त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यात कागदपत्रे आढळली. यावेळी अंकित पांडे यांचा संपर्क क्रमांक आढळल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना फाईल परत करण्यात आली.


कॉपी करू नका.