भुसावळात उद्या हॉटेल प्राईडचा शुभारंभ


खवैय्यांसाठी मोठी उपलब्धी : बारसह रेस्टारंटची सुविधा : फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय

भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अलिशान वॉटर पार्कसमोर मंगळवार, 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता हॉटेल प्राईड बिअर बार अ‍ॅण्ड रेस्टारंटचा भव्य शुभारंभ होत आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज असताना त्यांच्यासह खवैय्यांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. माजी सरपंच गुरूजीतसिंग चाहेल यांच्या शुभहस्ते या हॉटेलचा शुभारंभ होत आहे.

न्यु पंजाब खालसाच्या यशानंतर आता ‘प्राईड’ला मिळणार प्रतिसाद
भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर (छोटू भाऊ) माधव पाटील यांनी सुरू केलेल्या न्यू पंजाब खालसा हॉटेलला भुसावळसह तालुक्यातील ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे त्यामुळे नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेल प्राईडला ग्राहकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल यात शंकाच नाही.

शाकाहारी, मांसाहारी जेवणाची उत्तम सोय
हॉटेल प्राईडमध्ये खवैय्यांसाठी खास शाकाहारी व मांसाहारी जेवण उपलब्ध आहे शिवाय फॅमिलीला बसण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासह खवैय्यांसाठी पसंतीला उतरतील असे विविध मेनू या हॉटेलमध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. भुसावळ शहरासह तालुक्यातील ग्राहकांनी हॉटेलला भेट द्यावी, असे आवाहन हॉटेलचे संचालक सारंगधर (छोटू भाऊ) माधव पाटील यांनी केले आहे.


कॉपी करू नका.