काशी एक्स्प्रेसखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

रावेर : डाउन काशी एक्स्प्रेसखाली आल्याने एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी वाघोडा स्टेशन नजीक लोखंडी पुलाजवळ घडली. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तालुक्यातील वाघोडा रेल्वे स्टेशननजीक कि.मी.488/31/32 जवळ एक अनोळखी व्यक्ती दुपारी 2.50 वाजेच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडून जात असताना डाउन काशी एक्सप्रेसखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. मयताचे अंदाजे वय 50 ते 55 असून त्याचा रंग सावळा असून अंगात पांढरा शर्ट, ग्रे रंगाची फुल पँट आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी केले आहे. याबाबत भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार त्र्यंबक वाघ व नरेंद्र लोढे हे तपास करीत आहे.


