रेल्वे कर्मचार्‍यांच्या समस्यांबाबत रेल्वे महाप्रबंधकांना साकडे


रेल कामगार सेनेतर्फे संजीव मित्तल यांचा भगवी टोपी व शाल देवून सन्मान

भुसावळ : डीआरएम कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवा, जुनी पेंशन स्कीम सुरू करावी, पॉईंटस्मन व गेटमनची 12 ऐवजी आठ तास ड्यूटी करावे, नाईट पेट्रोलिंगसाठी दोन ट्रॅकमन द्यावेत, सर्व विभागात वेळेवर प्रमोशन व्हायलांच हवे, टीआरडी विभागातील सर्व कामगाराना जोखीम भत्ता देण्यात यावा, रेल्वे दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी तसेच उच्च प्रतीची औषधी उपलब्ध करण्याबाबत रेल कामगार सेना भुसावळ विभागातर्फे रेल्वे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना निवेदन देण्यात आले. प्रसंगी ललितकुमार मुथा, राजेश लखोटे, प्रदीप भुसारे, विनोद वाघे, रामदास आवटे, प्रीतम टाक, एम.के.शहा, सुरेंद्र यादव, प्रकाश करसाळे, पंकज ठाकरे, विशाल कुंवर, महेंद्र भोळे, संजय चौधरी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.