महिलेची विनयभंगानंतर आत्महत्या : तिघा आरोपींना सात वर्ष शिक्षा

भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचा निकाल
भुसावळ : धानोरी येथील विवाहितेने विनयभंगानंतर विहिरीत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रवीण भास्कर पाटील (धानोरी), संगीता ज्ञानेश्वर काळे व ज्ञानेश्वर नथ्थु काळे (दोघे रा.हरताळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 एप्रिल 2019 रोजी ही घटना घडली होती. भुसावळ सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले तर एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्यांना सात वर्ष शिक्षा तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद तसेच आरोपी क्रमांक एकने विनयभंग केल्याचे सिद्ध झाल्याने त्यास तीन वर्ष कारवासस व तीन हजार रुपये दंड तसेच अन्य कलमान्वयेदेखील दंड व शिक्षा सुनावण्यात आली.
अशी घडली होती घटना
धानोरी येथील तक्रारदार शंकर मधुकर पाटील (रा.धानोरी) हे पत्नी कल्पना व मुलांसह राहत असताना शेजारी त्यांचा चुलत भाऊ प्रवीण भास्कर पाटील हा देखील राहत होता. 13 एप्रिल 2009 रोजी शंकर पाटील हे त्यांच्या शालकासोबत कुर्हेपानाचे येथे गेल्याने कल्पना पाटील हे घरी एकट्या असल्याची संधी साधून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी प्रवीणने विवाहितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला शिवाय धमकीही दिली होती. दुसर्या दिवशी पाटील कुटुंबातील सदस्यांनी आरोपीच्या घरी जावून त्याची बहिण, मेहुणे व आईला आरोपीला समज देण्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी विवाहितेच्या चारीत्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ केली होती तर विवाहितेने गावाजवळील काशिनाथ आनंदा राणे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वरणगाव पोलिसात आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणून अॅड.विजय खडसे यांना कामकाज पाहिले.


